महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. ३१। पुणे । ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीमध्ये 2-1 ने टेस्ट सीरिजमध्ये हरवणाऱ्या टीम इंडियापुढे आता इंग्लंडचं (India vs England) आव्हान आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजला 5 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. भारतासाठी ही सीरिज कठीण ठरू शकते, कारण इंग्लंडची टीम फॉर्ममध्ये आहे. मागच्यावर्षी इंग्लंडच्या टीमने सर्वाधिक टेस्ट मॅच खेळल्या. 2020 मध्ये कोरोनामुळे फार क्रिकेट खेळलं गेलं नाही, पण इंग्लंडच्या बॅट्समन आणि बॉलरनी उत्कृष्ठ कामगिरी केली. आता या वर्षात इंग्लंडचे ६ खेळाडू भारतासाठी धोकादायक ठरू शकतात.
१ जो रूट
इंग्लंडचा कर्णधार जो रूटही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंका दौऱ्यामध्ये त्याने द्विशतक आणि एक शतकही केलं होतं. त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवू शकते,ही रान मशीन कशी थांबवायची हे भारतीय कर्णधार कोहली समोर आव्हान असेल .
२ बेन स्टोक्स
या सीरिजमध्ये भारतासाठी सगळ्यातम मोठा धोका बेन स्टोक्स (Ben Stokes)चा आहे. जगातला नंबर 1 ऑलराऊंडर असलेला बेन स्टोक्स सगळ्यात मोठा मॅच विनर आहे. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्येही स्टोक्स मॅच जिंकवून देऊ शकतो. 2020 साली त्याने 7 मॅचमध्ये 58.27 च्या सरासरीने 641 रन केले, यामध्ये 2 शतकं आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तर बॉलिंगमध्ये त्याने 7 मॅचमध्ये 19 विकेट घेतल्या.
३ डॉम सिबले
डावखुरा बॅट्समन डॉम सिबले (Dom Sibley) हादेखील टीम इंडियाला त्रास देऊ शकतो. डॉम सिबलेचं टेकनिक स्टीव्ह स्मिथसारखंच आहे, त्यामुळे तो ऑफ साईडऐवजी ऑन साईडला जास्त खेळतो. त्यामुळे भारतीय बॉलरना त्याच्या ऑफ साईडच्या कमजोरीचा फायदा घ्यावा लागेल. सिबलेने 2020 साली 9 मॅचमध्ये 47.30 च्या सरासरीने 615 रन केले आहेत. याशिवाय इंग्लंडचा कर्णधार जो रूटही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंका दौऱ्यामध्ये त्याने द्विशतक आणि एक शतकही केलं होतं.
४ स्टुअर्ट ब्रॉड
स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने 2020 साली 8 मॅचमध्ये 38 विकेट घेतल्या. श्रीलंका दौऱ्यातही त्याने चांगली बॉलिंग केली, त्यामुळे भारतीय बॅट्समनना ब्रॉडसमोर जपून खेळावं लागेल.
५ जेम्स अंडरसन
टीम इंडियासाठी चौथा धोका आहे जेम्स अंडरसन (James Anderson) चा. अंडरसनला भारतीय खेळपट्टीवर इंग्लंडसारखा स्विंग मिळणार नाही, पण अनुभव त्याच्या कामाला येऊ शकतो. अंडरसनने 157 टेस्ट मॅचमध्ये 606 विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टेस्टमध्ये अंडरसनने पहिल्या इनिंगमध्ये 40 रन देऊन 6 विकेट घेतल्या. या अनुभवी बॉलरने मागच्या 6 टेस्ट मॅचमध्ये 23 विकेट घेतल्या आहेत.
६ डॉम बेस
इंग्लंडचा ऑफ स्पिनर डॉम बेस (Dom Bess) यानेही 2020 साली चांगली कामगिरी केली. 8 मॅचमध्ये त्याने 16 विकेट घेतल्या. फास्ट बॉलर्ससाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर बेसने चांगली बॉलिंग केली. आता भारतातल्या स्पिनर्सना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर बेसला नक्कीच फायदा होऊ शकतो. डॉम बेस पहिल्यांदाच भारतात खेळणार असला, तरी त्याने मुंबईमध्ये बॉलिंगची ट्रेनिंग घेतली होती. श्रीलंका सीरिजमध्ये त्याने 2 टेस्टमध्येच 12 विकेट घेतल्या.