राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा भडका ; नांदेड, परभणीत पेट्रोल सर्वाधिक महाग

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. ३१। नांदेड । गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या भावात चढ-उतार पाहायला मिळतायत. वाढते पेट्रोलचे दर सामान्यांसाठीसुद्धा डोकेदुखी ठरत आहेत. लोकल रेल्वे सर्व सामान्यांसाठी खुली नसल्यानं बऱ्याचदा नोकरदार कर्मचारी वाहनानं प्रवास करतात. त्यातच पेट्रोलचे वाढते दर त्यांची चिंता वाढवत आहेत. राज्यात पेट्रोलचे दर वाढले असून, नांदेड आणि परभणीमध्ये पेट्रोल सर्वाधिक महाग आहे. नांदेडमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 95.26 रुपये आहे, तर परभणीत पेट्रोल प्रतिलिटर 95.05 रुपये आहे. दुसरीकडे सर्वाधिक महाग डिझेल औरंगाबाद, नांदेड आणि परभणीत आहे. नांदेडमध्ये डिझेल प्रतिलिटर 84.37 रुपये प्रतिलिटर आहे. तर परभणीत डिझेल प्रतिलिटर 84.15 रुपये प्रतिलिटर आहे. (Petrol And Diesel Explode Once Again; Petrol Most Expensive In Nanded, Parbhani)

शहरं आजचे पेट्रोलचे भाव आजचे डिझेलचे भाव
अकोला 93.25 81.98
अमरावती 93.88 83.36
औरंगाबाद 93.64 84.54
भंडारा 93.74 82.92
बीड 93.27 82.45
बुलढाणा 93.07 82.27
चंद्रपूर 93.37 82.57
धुळे 93.44 82.62
गडचिरोली 93.44 82.64
गोंदिया 93.75 82.92

सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात (Petrol Price Today).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *