महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.३। मुंबई । लोकल सुरू झाल्याने मुंबईकरांनी एकच निःश्वास सोडला. पण पहिल्याच दिवशी मास्क न घातल्याने 500 हून अधिक प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला आहे.लोकलमध्ये प्रवास करताना मास्क घालणे बंधनकारक आहे. असे असले तरी अनेक प्रवासी बेफिकीर राहत मास्क घालत नाही. रेल्वे आणि पालिकेने अशा 500 हून अधिक प्रवाशांना दंड ठोठावला आहे. मुंबई महानगरपालिकेने अशा 275 प्रवाशांकडून दंड आकारला अहे. प्रत्येक प्रवाशांकडून 200 रुपये दंड घेण्यात आल आहे. तर पश्चिम रेल्वेने 237 प्रवाशांना मास्क न घातल्याबद्दल दंड आकारला आहे.
सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच दुपारी 12पासून दुपारी 4पर्यंत आणि रात्री 9पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 12 व दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.
…तर महिनाभर तुरुंगात
तब्बल दहा महिन्यांच्या अंतरानंतर सोमवारपासून लोकल सेवा सर्वसामान्यांना खुली करण्यात येत आहे. परंतु सर्वसामान्य प्रवाशांना प्रशासनाने आखून दिलेल्या निर्धारित वेळेतच प्रवास करता येणार आहे. तसे न केल्यास प्रवाशांना 200 रुपये दंड आणि एक महिन्याचा तुरुंगवास अशा कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे प्रवाशांनी नेमून दिलेल्या वेळेचे पालन करून सहकार्य करावे असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.