इन्स्टाग्रामवर डिलिट केलेल्या पोस्ट पुन्हा मिळणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.७। पुणे । फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टाग्राम या फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्मने युजर्सना चांगली बातमी दिली आहे. इन्स्टाग्रामवर डिलिट केलेल्या पोस्ट पुन्हा बघता येतील आणि परत मिळवता येतील, असे नवे फिचर कंपनीने लाँच केले आहे. एका ब्लॉग पोस्टद्वारे कंपनीने फिचर रोलआऊट होत असल्याची माहिती दिली. या फिचरद्वारे 30 दिवसांमधील जुन्या डिलिट झालेल्या पोस्ट री-स्टोअर करता येतील. त्याद्वारे फोटो, व्हिडिओ, रील्स सर्वांसाठी काम करेल. विशेष म्हणजे नव्या अपडेटनंतर युजर्स त्यांच्या स्टोरीज री-स्टोअर करू शकतील. पण स्टोरीज 30 दिवस नव्हे तर केवळ 24 तासांमध्येच री-स्टोअर करता येईल.

नवीन अपडेटनंतर इंस्टाग्राम अकाउंटवरुन डिलिट केलेले फोटो, व्हिडिओ, रील्स आणि आयजीटिव्ही व्हिडिओ टाइमलाइनवरून कायमस्वरुपी डिलिट होतील. पण, कंपनी हा डेटा ‘रिसेंटली डिलिटेड फोल्डर’मध्ये ठेवेल. तिथून महिन्याभरात डेटा पुन्हा घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *