महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.९ । पिंपरी । कै.नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिराचा कार्यक्रम म्हाडा मोरवाडी येथील एसएनबीपी स्कूल येथै संपन्न झाला रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीराचे उदघाटन पिपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री लक्ष्मण पांडुरंग गोफणे साहेब व नगरसेविकाआशाताई शेंडगे -धायगुडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी उद्योजक श्री विजयराज पिसे डाॅ दिनेश गाडेकर उपअभियंता विजय भोजने डाॅ संजीव शभूस उपस्थित होते रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले साधारण तपासणी २५ , नेत्र तपासणी ८०,दंत तपासणी ३५ करण्यात आल्या यावेळी संतोष पांढरे , गजानन म्हैसने पाटील, सुनिल बनसोडे , जीवन पिसे , समाजिक कार्यकर्त्या रोहिणी रासकर , हिराकांत गाडेकर , गणेश एकल ,डाॅ .मंजुषा इंगळे , मल्हारी काळे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सौ. रेणुका भोजने , कांचन भोजने , प्रथमेश भोजने , निरज भोजने , अर्थव भोजने , रजनीकांत गायकवाड यश गजबरे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे आयोजन श्री दिपक भोजने मित्र परिवारा तर्फे करण्यात आले होते.