विठुरायाच्या लग्नासाठी खास पोशाख, बंगळुरुच्या फॅशन डिझायनरने बनवला पेहराव

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.११ । पंढरपूर । सध्या लग्न म्हणाले की बस्ता आला आणि नवरा नवरीचे खास पोषाखही मुख्य आकर्षण असते . पण वसंत पंचमीला होणाऱ्या देवाच्या विवाहाला बंगळुरु येथील व्यवसायाने फॅशन डिझायनर असलेल्या सविता चौधरी यांनी विठुराया व रुक्मिणी मातेच्या विवाह पेहराव डिझाइन केला आहे .विठुरायाच्या बाराबंदीच्या अंगीवर शंख, चक्र व ओम या खुणा रंगीत मणी आणि मोत्याच्या साहाय्याने अतिशय आकर्षक पद्धतीने बनविल्या आहेत . तर रुक्मिणी मातेलाही पांढऱ्या शुभ्र उच्च प्रतीची रेशमी कांजीवरम साडी अर्पण केली आहे .

सविता चौधरी यांनी बंगळुरुमध्ये आपला फॅशन डिझायनिंगचा व्यवसाय सुरु केल्यावर पहिला पेहराव देवाचा बनवला आहे. वसंत पंचमी ते रंग पंचमी हा विठुरायाच्या विवाह सोहळ्याच्या कालावधीत देवाला व रुक्मिणी मातेला पांढरी वस्त्रे परिधान केली जात असतात.यंदा कोरोनामुळे मात्र हा विवाहसोहळा केवळ मोजक्या मंडळींच्या उपस्थतीत साजरा होत असल्याने यंदा वऱ्हाडी मंडळींच्या संख्येला ब्रेक लागला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *