राज्यातील आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध, पैसे काढण्यावर घातली बंदी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नाशिक – दि. ११ – सहकारी बँका मागील काही दिवसापासून संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पश्चिम महाराष्ट्रातील दोन सहकारी बँकांवर कारवाई केल्यानंतर राज्यतील आणखी एक सहकारी बँक अवघ्या काही दिवसातच संकटात सापडली आहे. रिझर्व्ह बँकेने नाशिकमधील इंडिपेंडेंस को-ऑपरेटिव्ह बँकेमधून पैसे काढण्यावर बंदी घातली आहे. डिपॉझिट इंश्योरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन विमा योजनेच्या चौकटीत बँकेतील ९९.८८ टक्के ठेवीदार आहेत.रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात सांगितले की, सहा महिन्यांसाठी इंडिपेंडेंस बँकेमधून पैसे काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. सध्याची आर्थिक स्थिती पाहता ठेवीदारांना बँकेच्या बचत किंवा चालू खाते तसेच अन्य कुठल्याही खात्यामधून जमा रकमेमधील कुठलीही रक्कम काढण्याची परवानगी नसेल. ठेवीदार हे ठेवींच्या बदल्यात कर्जाची फेड करू शकतात. त्यासाठीही काही अटी लागू आहेत असेही स्पष्ट केले आहे.

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने बुधवारी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर या बँकेवर अजून काही निर्बंध लादले. त्याअंतर्गत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कुठलेही कर्ज देऊ शकणार नाहीत. तसेच कुठल्याही कर्जाचे नुतनीकरण करू शकणार नाहीत. याशिवाय कुठलीही गुंतवणूक किंवा कुठल्याही रकमेची फेड करणार नाहीत.रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार निर्बंधांनंतरही आपला बँकिंग व्यवहार बँक पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवू शकेल. स्थितीत सुधारणा होईपर्यंत हे निर्बंध आर्थिक सुरू राहतील. केंद्रीय बँकेने हे सुद्धा सांगितले की, रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार निर्बंधांमध्ये दुरुस्तीही करू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *