माघी गणेश जयंती : राज्यात भाविकांचा उत्साह; बाप्पाच्या मंदिरात फुलांची आरास व विद्युतरोषणाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ ।पुणे । आज गणेश जयंती (Maghi Ganesh Jayanti 2021) , त्यानिमित्ताने गणरायाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटे पासूनच भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा (Ganesh Jayanti 2021) लावल्या आहेत. संगीत, यज्ञ, महाआरती आणि विविध कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. पुण्यातील दगडूशेठ मंदिरात दुपारी १२ वाजता गणेश जन्म सोहळा पार पडणार असून मंदिर परिसरात फुलांची विशेष आरास करण्यात आली आहे. . PUNE GANESH JAYANTI

गणेशजन्मानिमित्त ‘दगडूशेठ’ ला स्वराभिषेक, गणेश जागर आणि जन्म सोहळा उसा उत्सव साजरा होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. बाप्पाच्या मंदिरात फुलांची आरास व विद्युतरोषणाई असल्यामुळे वातावरण अतिशय मंगल आहे.

गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त
गणेश जयंतीची तिथि- १५ फेब्रुवारी २०२१, सोमवारी
चतुर्थी तिथि आरंभ- १५ फेब्रुवारी २०२१, सोमवारी रात्री १.५८ वाजता
चतुर्थी तिथि समाप्त- १६ फेब्रुवारी २०२१, मंगळवारी पहाटे ३.३६ वर
गणेश जयंती पूजा मुहूर्त – १५ फेब्रुवारी सकाळी ११ वाजून २८ मिनिटे ते दुपारी १ वाजून ४३ मिनिटे
पूजेचा कालावाधी – २ तास १४ मिनिटे
गणेश जयंती – १५ फेब्रुवारी पहाटे ६ वाजून ५९ मिनिटे आणि सायंकाळी ६ वाजून २९ मिनिटे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच आज बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला. मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *