महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ । पुणे । निर्दोष व्यक्तीला न्याय मिळावा म्हणून न्यायालयात कायद्याची अंमलबजावणी सत्य मार्गाने होण्यासाठी न्यायालयीन व्यवस्थेचा कारभार सर्व घटकातील लोकांकडे असला पाहीजे, म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेत कोणत्याही एका गटाचे वर्चस्व नसावे. न्यायालयीन व्यवस्थेत सर्वोच्चपदी असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायधीश माननीय रंजन गोगोईं यांनी न्यायालयीन व्यवस्थेबाबत जे विधान केले आहे ते गंभीर आहेच परंतू तेच विधान ते निवृत्त व्हायच्या आधी का करू शकले नाहीत…..ही बाब अतीशय गंभीर विचार करायला लावणारी आहे…. चांगल्या हुशार माणसाने कोर्टाची पायरी चढू नये अस म्हणतात ते आता खरे वाटायला लागले आहे…..लोकशाही प्रधान देशात न्यायालयीन व्यवस्था जिर्ण झाली असेल तर देशाची वाटचाल कोणत्या दिशेने चालली आहे हे सर्व सामान्य माणसालाही लगेच समजण्यासारखे आहे.
कारण न्यायालयीन व्यवस्थेवर दडपण असल्या शिवाय आणि न्यायधीश वर्ग प्रामाणिक नसल्याशिवाय न्यायालयीन व्यवस्थेची अवस्था जिर्ण होऊच शकत नाही. कोठेतरी पाणी मुरत आहे हे नक्कीच….. न्यायालयीन अधीकार हे सरकारने नाहीतर जनतेने दिलेले असतात हि भावना न्यायालयीन प्रक्रियेत का करणारया घटकांच्या मनात निर्माण झाली पाहीजे…कारण न्यायधीशांना जनता माणूस नाहीतर “न्याय देवता” मानतात याचे जाणीव न्यायधीशांना असली पाहिजे. जनता न्यायालयाला मंदिर तर न्यायधीशाला देव मानतात. काही लोक आयुष्य संपे पर्यंत सत्य निकालाची/ न्यायाची वाट बघत असतात. देशाच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक विकासाबरोबर सामाजिक विकास होणेही तितकेच अत्यावश्यक आहे आणि म्हणून न्यायालयीन प्रक्रियेत सुधारणा होणे गरजेचे आहे….पि.के.महाजन.