मुंबईतील फास्टॅग सक्तीबाबत महत्वाची बातमी, सक्ती लांबणीवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१६ । मुंबई । फास्टॅगसक्तीबाबत (Fastag) महत्वाची बातमी. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी फास्टॅगला (Fastag) पुन्हा मुदतवाढ देण्यास ठाम नकार दिला आहे. त्यामुळे तुमच्या वाहनावर फास्टॅग स्टिकर नसेल तर त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे. देशातील सर्वच महामार्गांवर वाहनचालकांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, मुंबईकरांना (Mumbai) मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या वेशींवर फास्टॅगसक्ती महिन्याभरानंतर करण्यात येणार आहे. इतरत्र आजपासून अंमलबजावणी होणार आहे. जर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल द्यावा लागणार आहे.

राज्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत नागपूर विभागाच्या अखत्यारीत साधारण 25 टोल नाके , तर मुंबई विभागातील 22 टोल नाक्यांवर फास्टॅगची अंमलबजावणी होईल. देशात टॅगच्या वापराचे प्रमाण साधारण 80 टक्के असून महाराष्ट्रात ते 70 ते 75 टक्के आहे. मात्र, आजपासून ज्या वाहनांवर फास्टॅग नसेल त्यांना चांगलेच महागात पडणार आहे. मुंबईच्या वेशींवर मात्र फास्टॅगसक्ती लांबणीवर गेली आहे. आता महिनाभरात फास्टॅगची 100 टक्के अंमलबजावणी होऊ शकेल.

वाहनांची गर्दी टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने ‘वन नेशन, वन फास्टॅग’ धोरण लागू केले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील टोलनाक्यांवर मार्शलची नियुक्त केले जाणार आहेत. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीसही नेमण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राज्य शासनाकडे केली आहे.वाहनावर टॅग नसल्यास मार्शल चालकास टोल नाक्यावरील टॅग विक्रीच्या ठिकाणी घेऊन जातील आणि टॅग बसवण्यास सांगतील. मंगळवारपासून अंमलबजावणी होणार असल्याने टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *