15 मे पर्यंत स्वीकारावी लागणार व्हॉट्सअॅपची वादग्रस्त प्रायव्हसी पॉलिसी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. १९ – नवीन वर्षाच्या सुरूवातीला इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीवर प्रचंड टीका झाल्यानंतर आता आपल्या व्यासपीठावर गोपनीयता संबंधित अटी व धोरणे पुन्हा लागू करण्यासाठी इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअॅपने पूर्ण तयारी केली आहे. गुरूवारी आपली नवीन प्रायव्हसी पॉलिसी व्हॉट्सअॅपने जारी केली आहे. पण युजर्सचा यावेळेस गोंधळ होऊ नये, यासाठी शब्दांचा काळजीपूर्वक वापर करण्यात आला आहे.

एका छोट्या बॅनरद्वारे युजर्सना अ‍ॅपमध्ये आपली नवीन पॉलिसी समजावण्याचा व्हॉट्सअॅपचा प्रय़त्न आहे. ही पॉलिसी 15 मे पर्यंत स्वीकारावी लागेल. नवीन प्रायव्हसी पॉलिसी जानेवारीमध्ये जारी केल्यानंतर जगभरातून व्हॉट्सअॅपवर टीका झाली, त्यानंतर कंपनीने नवीन पॉलिसी लागू होण्याची तारीख पुढे ढकलली होती. कंपनीने टीका झाल्यानंतरही आपल्या पॉलिसीमध्ये बदल केलेला नाही, तर आता कंपनीने आपल्या नवीन पॉलिसीबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे.

मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर पॉलिसीमध्ये बदल झाल्याने कोणताही परिणाम होत नसल्याचे स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपकडून देण्यात आले आहे. तसेच, केवळ बिजनेस युजर्ससाठी नवीन पॉलिसी असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. तुमचे खासगी मेसेज आधीप्रमाणेच 100 टक्के एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जातील. मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर पॉलिसीमध्ये बदल झाल्याने कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्टीकरण व्हॉट्सअ‍ॅपने दिले आहे. तसेच, नवीन पॉलिसी 15 मेपासून लागू होईल, असे व्हॉट्सअ‍ॅपकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *