ऑलराउंडर यूसुफ पठाण निवृत्त ; भारतासाठी 2 विश्वचषक जिंकणे आणि सचिनला खांद्यावर उचलणे सर्वात अविस्मरणीय क्षण- यूसुफ

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24। विशेष प्रतिनिधी । दि.२७। मुंबई ।भारतीय ऑलराउंडर यूसुफ पठाणने क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. यूसुफ 2007 मध्ये टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघात सामील होता. याशिवाय, 3 IPL चँपियन टीममध्येही तो होता.ऑफ स्पिन ऑलराउंडर यूसुफने एक स्टेटमेंट जारी करुन निवृत्तीची घोषणाक केली. त्यात त्याने म्हटले की, ‘मी माझाये कुटुंब, मित्र, चाहते, टीम, कोच आणि पूर्ण देशाचे मनापासून आभार मानतो. त्यांच्याकडून मला खूप प्रेम आणि समर्थन मिळाले.’ यूसुफने भारतासाठी 57 वनडे आणि 22 टी-20 सामने खेळले आहेत.

यूसुफने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात 2007 टी-20 वर्ल्ड कप फायनलमधून केली. त्या सामन्यात यूसुफने जखमी वीरेंद्र सेहवागची जागा घेतली होती. यूसुफने सामन्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद आसिफच्या बॉलवर छक्का मारला होता. त्या सामन्यात यूसुफने 8 बॉलमध्ये 15 धावा केल्या होत्या.

यूसुफ IPL मधील यशस्वी खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि सनराइजर्स हैदराबादकडून सामने खेळले आहेत. यूसुफने IPL मध्ये 174 सामन्यात 3204 धावा आणि 42 विकेट घेतल्या आहेत.

यूसुफने आपल्या पत्रात म्हटले की, ‘मला आजही तो दिवस आठवतो, जेव्हा मी पहिल्यांदा टीम इंडियाची जर्सी घातली होती. त्या दिवशी मी फक्त जर्सी घातली नाही, तर कुटुंब, कोच, मित्र आणि संपूर्ण देशाची आशा आपल्या खांद्यावर घेतली होती. लहानपणापासून माझे आयुष्य क्रिकेटच्या आवती-भोवती फिरले. मी इंटरनॅशनल, डोमेस्टिक आणि आयपीएलमध्ये खेळलो.आजचा दिवस वेगळा आहे. आज वर्ल्ड कप किंवा आयपीएल फायनल नाही. मी अधिकृतरित्या खेळाच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा करतो. प्रेम आणि सपोर्टसाठी कुटुंब, मित्र, चाहते, सर्व टीम, कोच आणि संपूर्ण देशाचे आभार मानतो.

भारतासाठी दोन वर्ल्ड कप जिंकणे आणि सचिन तेंडुलकरला आपल्या खांद्यावर उचलणे, माझ्या करिअरमधील सर्वात अविस्मरणीय क्षण आहे. मी माझा इंटरनॅशनल डेब्यू धोनीच्या नेतृत्वात केला, IPL डेब्यू शेन वार्नच्या नेतृत्वात केला, रणजी डेब्यू जेकब मार्टिनच्या नेतृत्वात केला. माझ्यावर विश्वास दाखवण्यासाठी त्या सर्वांचे आभार मानतो. सोबतच मी माझा भाऊ आणि पाठीचा कणा असलेल्या इरफान पठानचेही आभार मानतो. चांगल्या आणि वाईटवेळी तो माझ्या सोबत होता. शेवटी BCCI आणि ‌BCA चे आभार मानतो. त्यांनी मला देश आणि राज्यासाठी खेळण्याची संधी दिली.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *