महाग पेट्रोल-डिझेलचा फायदा घेण्यासाठी सायकल उद्योग उतरला ई-बाइक्समध्ये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.५ मार्च – पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भलेही बहुतांश उद्योगांना सतावत अाहेत, मात्र लुधियानाचा सायकल उद्योग याकडे एक संधी म्हणून पाहत आहे. जगातील दुसरा मोठा सायकल उद्योग या संधीचा फायदा उचलत ई-बाइक्स (इलेक्ट्रिक सायकल) निर्मितीत गुंतला आहे. या इलेक्ट्रिक सायकल्सची देशात मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. विदेशातून त्यासाठी चांगल्या ऑर्डरही मिळत आहेत. ई-बाइक्स बॅटरीयुक्त सायकल असते. ती पॅडल मारून आणि बॅटरीनेही चालवता येऊ शकते. त्यामुळे हिचा वापर शहरापासून लांब पल्ला गाठण्यासाठी सहज केला जाऊ शकतो. जगभरात ई-बाइक्सना खूप चांगली मागणी आहे. यामुळे उद्योग निर्यातीची शक्यता तपासत आहे. काही मोठ्या कंपन्या युरोपमधून ऑर्डर घेण्यात यशस्वी होत आहेत.

ई-बाइक्स श्रेणीत दुप्पट वाढ
आगामी काळात ई-बाइक्सची श्रेणी सर्वात वेगाने वाढणार आहे. पुढील वर्षी हीरो सायकलही ई-बाइक्स श्रेणीत दुप्पट वाढ नोंदवेल. – पंकज मुंजाल, सीएमडी, हीरो मोटर्स कंपनी

सर्वात मोठी श्रेणी होत आहे. पुढील वर्षापासून आम्ही उत्पादन दुप्पट करू. उत्पादनाची ५० टक्के निर्यात केली जाईल. आम्ही या वर्षापासून ई-बाइक्स तयार करण्यास सुुरुवात करत आहोत. मागणी चांगली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने ई-बाइक्स

उद्योगातील दिग्गजांनुसार, सरकार प्रत्येक शहरात सायकल ट्रॅकचे धोरण पूर्ण करत असेल तर आगामी काळ ई-बाइक्सचाच असेल. शहरांत अंतर जास्त असल्यामुळे सामान्य लोक सायकलऐवजी ई-सायकलला प्राधान्य देतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *