महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.७ मार्च –मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा 9 मार्चला होणारा वर्धापनदिन सोहळा रद्द करण्यात आलाय. त्याऐवजी पक्ष वाढीसाठी ऑनलाइन आणि ऑफ़लाइन माध्यमातून सदस्य नोंदणी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. मनसे नेते नितीन सरदेसाईंनी ही माहिती दिलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर करणार असल्याचही कळतय.