महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१३ मार्च । मुंबई । देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घट होताना दिसत आहे. पण तरीही अनेक ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर हे 95 रुपयांच्या पुढेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले होते. विशेष म्हणजे सलग 13 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल होत नसल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. (Petrol Diesel Price Today Update)
दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.
महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.63 रुपये इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीत 99.33 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय नांदेडमध्ये डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 89.25 रुपये इतका आहे.
महाराष्ट्रातील काही शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
अहमदनगर ₹ 97.77 ₹ 87.45
औरंगाबाद ₹ 98.24 ₹ 87.90
बीड ₹ 98.88 ₹ 88.53
बुलडाणा ₹ 98.28 ₹ 87.96
धुळे ₹ 97.45 ₹ 87.14
जळगाव ₹ 98.61 ₹ 88.25
जालना ₹ 98.93 ₹ 88.56
कोल्हापूर ₹ 98.04 ₹ 87.73
लातूर ₹ 98.90 ₹ 88.55
मुंबई शहर ₹ 97.57 ₹ 88.60
नागपूर ₹ 97.39 ₹ 87.11
नांदेड ₹ 99.63 ₹ 89.25
नंदूरबार ₹ 98.31 ₹ 87.98
नाशिक ₹ 97.90 ₹ 87.54
उस्मानाबाद ₹ 98.05 ₹ 87.73
परभणी ₹ 99.33 ₹ 88.94
पुणे ₹ 97.37 ₹ 87.06
रायगड ₹ 97.38 ₹ 87.04
रत्नागिरी ₹ 98.88 ₹ 88.51
सांगली ₹ 97.48 ₹ 87.19
सातारा ₹ 98.26 ₹ 87.90
सिंधुदुर्ग ₹ 98.94 ₹ 88.59
सोलापूर ₹ 98.10 ₹ 87.78
ठाणे ₹ 97.09 ₹ 86.76