औषध विक्री करताना मास्क लावला नाही, कारवाई करत ४ दुकानं बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१३ मार्च । संभाजीनगर । औषधी विक्री करताना मास्क नसने, मास्क नसलेल्या ग्राहकांना औषधी दिल्या प्रकरणी शहरातील चार औषधी दुकानांवर ( coronavirus aurangabad ) कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या तपासणीत हा प्रकार आढळला. त्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने संबंधितांना नोटीस देत दुकाने अंतरिम बंद करण्याचे आदेश दिले. पहिल्यांदाच औषधी दुकांनावर अशा प्रकारची शहरात कारवाई करण्यात आली.

करोना विषाणूंचा प्रादुर्भाव शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. वाढते रुग्ण संख्या लक्षात घेत प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतरही अनेकजन तोंडाला मास्क न लावता फिरत आहेत. काही दुकानांमध्येही उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त शहरात विविध ठिकाणी भेटी देत मास्क, सुरक्षित वावर असे नियम पाळले जात आहेत की नाही याची पाहणी करत आहेत. अनेक औषधी विक्रेताही बेजबाबदारपणे वागत असल्याचे शुक्रवारी समोर आले. अशा चार विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये एका औषध विक्रेत्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावन्यात आला असे सूत्रांनी सांगितले. दुकानांना औषधी विभाग प्रशासनाकडून नोटीस देण्यात आल्या आहेत त्यासह तीन औषधी दुकाने बंद करण्याचे अंतरिम आदेश दिलेले आहेत.

रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना औषधी विक्रेते नियम पाळत नसल्याचे समोर आले. सह आयुक्त संजय काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियदर्शनी कॉलनीतील पटेल मेडिकल स्टोअर्स, सूतगिरणी चौकातील गायत्री मेडिकल, कांचनवाडीतील दवा इंडिया व बीड बायपास रोडवरील नोबेल मेडिकल या औषधी दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *