बुलेट ट्रेन: मुंबई-नाशिक-औरंगाबाद-नागपूर बुलेट ट्रेनच्या मार्गाचे सर्वेक्षण सुरू, लिडार तंत्रज्ञानाने सर्वेक्षणाचे काम

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१३ मार्च । मुंबई । समृद्धी महामार्गाला लागून प्रस्तावित असलेल्या ७३६ िकमीच्या बुलेट ट्रेन मार्गाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण शुक्रवार, दि. १२ मार्चपासून सुरू झाले आहे. विमानामध्ये ‘लिडार’चे यंत्र (लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग) बसवून त्याद्वारे हे सर्वेक्षणाचे काम होत आहे. सर्वेक्षणाचे काम चार महिने चालेल. सर्वेक्षणासोबतच डीपीआरचेही काम सुरू असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या अपर महाव्यवस्थापक सुषमा गौर यांनी दिली. विशेष म्हणजे प्रथमच या प्रस्तावित प्रकल्पाचा मार्गही त्यांनी आज जाहीर केला असून त्यात औरंगाबाद, शिर्डी, जालना या शहरांचाही उल्लेख आला आहे.

देशात बुलेट ट्रेन प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन केली. कंपनीने मुंबई-अहमदाबाद या प्रकल्प प्रत्यक्ष सुरू केल्यानंतर देशात ७ नवीन बुलेट ट्रेनचे मार्ग जाहीर केले. त्यात मुंबई-नाशिक-नागपूर या मार्गाचाही समावेश आहे. या मार्गात सुरुवातीला अधिकृतपणे औरंगाबादचा नव्हता. मात्र, समृद्धी महामार्गाला लागून हा नवा रेल्वेमार्ग करण्याचे निश्चित झाले आहे.

यापूर्वी अधिकृतपणे हा मार्ग नेमका कुठून जाणार, हे घोषित नव्हते. केवळ मुंबई-नाशिक-नागपूर एवढेच या मार्गाचे नाव होते. आज मात्र सर्वेक्षणाला सुरुवात करत असताना नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने या मार्गावरील शहरे, गावेही जाहीर केली आहेत. त्यात खापरी, वर्धा, पुलगाव, कारंजा लाड, मालेगाव जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर या शहरांचा समावेश आहे.
विमानातील लिडार तंत्रज्ञानाद्वारे मुंबई-नागपूर या बुलेट ट्रेन मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले.मुंबई-नागपूर मार्गाचे सर्वेक्षण लिडार तंत्रज्ञानाने होत आहे. रडारप्रमाणे लिडार हे तंत्रज्ञान आहे. हे यंत्र विमानवर इन्स्टॉल केले असून शुक्रवारी हे विमान सर्वेक्षणासाठी झेपावले. यात १०० मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्याने प्रत्यक्ष जागेचे चित्रीकरण होणार आहे. ज्यात प्रस्तावित मार्गाच्या १५० मीटर आजूबाजूच्या जमिनींची स्थिती कळेल. झाडे, पिके, तलाव, जमिनीचे प्रकार आणि रस्ते, पायवाटांचीही माहिती मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *