महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१३ मार्च । पुणे । एकीकडे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. यामुळे सोने खरेदी करणार्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरत आहे. शुक्रवारी सोन्या चांदींच्या किमती खाली आल्या आहेत. मागील 11 महिन्यांत सोन्याच्या दरात तब्बल 12 हजार रुपयांची घसरण झाली आहे. गुरुवारी महाशिवरात्र असल्याने सराफा बाजार बंद होता.
शुक्रवारी सकाळी बाजार खुला होताच सोन्याच्या दरात 291 रुपयांची घसरण होऊन बाजार प्रतितोळा 44,530 वर स्थिर झाला. तर चांदीदेखील 1096 रुपयांनी घसरुन 66740 रुपयांब्वर स्थिर झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या – चांदीचे प्रति औस अनुक्रमे 1,707 डॉलर आणि 25.67 डॉलर प्रति औस व्यापर होते. एप्रिलच्या सोन्याच्या वायदा भावात 138 रुपयांची घट झाली. सकाळी बाजार खुला होताना सोन्याचा भाव 44 हजार 530 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. बुधवारी बाजार बंद होताना सोन्याचा दर 44 हजार 879 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. शुक्रवारी वायदे बाजारात चांदीचे दर 776 रुपयांनी घसरुन 66,769 रुपये प्रतिकिलोवर बंद झाले. कमकुवत मागणीमुळे.व्यापार्यांनी सौदे कमी केले आणि त्यामुळे शुक्रवारी वायदा बाजारात प्रति दहा ग्रॅम 0.81 टक्क्यांनी घसरून ते 44530 रुपये झाले.
सोन्याच्या दरात घट होण्याची कारणे
अमेरिकेत सरकारी बॉण्डसना मागणी वाढली
जागतिक भांडवली बाजारात तेजी
अमेरिकी डॉलर पुन्हा मजबूत
या सर्व गोष्टी जुळून आल्याने
गुंतवणूकदारांनी सोन्यातील
गुंतवणूक काढून घेतली.