५ हजार मासिक पेन्शन ; Atal Pension Yojana- APY : रोज ७ रुपये वाचवून मिळवू शकता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १३ मार्च – पुणे – Atal Pension Yojana- APY : अटल पेन्शन योजना (एपीवाय) ही असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना निवृत्तीवेतन देण्यासाठी सुरू केली गेली होती, परंतु आता कोणताही भारतीय नागरिक या योजनेत १८ ते ४० वयोगटातील गुंतवणूक करून पेन्शन मिळवू शकेल. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणे आवश्यक आहे. या योजनेत ठेवीदारांना ६० वर्षानंतर पेन्शन मिळणे सुरू होते. अटल योजनेतील पेन्शनची रक्कम आपण केलेली गुंतवणूक आणि आपले वय यावर अवलंबून असते.

या योजनेंतर्गत किमान एक हजार रुपये, २००० रुपये, ३००० रुपये, ४००० रुपये व जास्तीत जास्त ५००० रुपये पेन्शन मिळू शकते. केंद्र सरकारच्या वतीने मे २०१५ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती. तुम्हाला या पेन्शन योजनेसाठी नोंदणी करायची असेल तर तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर आवश्यक आहे.

जितक्या लवकर आपण अटल पेन्शन योजनेत सामील व्हाल तितका अधिक फायदा तुम्हाला मिळेल. वयाच्या १८ व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत एखादी व्यक्ती सामील झाली तर वयाच्या ६० वर्षानंतर नंतर त्याला ५ हजार रुपये मासिक पेन्शनसाठी २१० रुपये दरमहा जमा करावे लागतात. म्हणजेच या योजनेत दररोज ७ रुपये जमा केल्यास तुम्हाला महिन्याला ५००० रुपये पेन्शन मिळू शकते. या योजनेत दरमहा १००० रुपये मासिक पेन्शनसाठी केवळ ४२ रुपये दरमहा जमा करावे लागतात, तर २ हजार रुपये पेन्शनसाठी ८४ रुपये, ३ हजार रुपयांकरिता १२६ रुपये आणि ४ हजार रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी १६८ रुपये जमा करावेत.

अटल पेन्शन योजनेचे ग्राहक या योजनेत केलेली गुंतवणूक तपासण्यासाठी APY मोबाइल APY and NPS Lite App वापरू शकतात. एपीवाय यूझर्ससाठी अलीकडील ५ व्यवहार तपासण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. यासह आपण आपले व्यवहार ट्रान्झेक्शन स्टेटमेंट आणि ई-PRAN कोणत्याही शुल्काशिवाय डाउनलोड करू शकता. त्याच वेळी, आपल्या एपीवाय व्यवहाराचे स्टेटमेंट पाहण्यासाठी आपल्याला APY NSDL CRA वेबसाईटला भेट द्यावी लागेल. येथे लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपल्या PRAN आणि बचत खात्याचा तपशील आवश्यक असेल.

जर आपला PRAN नसेल तर आपल्याला आपले नाव, खाते क्रमांक आणि जन्मतारीख वापरावी लागेल. याशिवाय अटल निवृत्तीवेतन योजनेचे सदस्य आपले एकूण योगदान, व्यवहाराचे तपशील आणि ईपीआरएएन कार्ड उमंग अॅपद्वारे डाउनलोड करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *