BSNL चा धमाकेदार प्लॅन? १२९ रूपयांत बरंच काही….पाहा काय आहे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १६ – मुंबई – तुमच्या मनोरंजनासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL धमाकेदार ऑफर घेऊन आला आहे. कंपनी YUPPTV अंतर्गत BSNL आपल्या ग्राहकांना स्वस्तात मस्त प्लॅन देत आहे. वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या पॅकसाठी तुम्हाला हजाराहून अधिक पैसे मोजावे लागतात. मात्र BSNL च्या या नव्या प्लॅनसाठी तुम्हाला हजार रूपयेही खर्च करायची गरज नाही.

१२९ रुपयांत ३ महिन्यांसाठी OTT सर्व्हीस देण्यात येणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार BSNL च्या या प्लॅनमध्ये ZEE5 Premium, SonyLIV, Voot Select चे पॅक मिळणार आहे. जर यांचे नेहमीचे पॅक ग्राहक घ्यायला गेले, तर ते तुलनेने महागात पडतात. पण BSNL ने आपल्या ग्राहकांना हे केवळ १२९ रूपयांत देण्याची ऑफर दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ग्राहकांना ३०० हून अधिक Live TV चॅनल पाहता येणार आहेत. शिवाय BSNL च्या पॅकमध्ये तुम्हाला फक्त १२९ रूपयांत ८ हजाराहून अधिक सिनेमा आणि ५०० हून अधिक TV शो पाहता येणार आहेत.BSNL ने सांगितले आहे की ग्राहकां YuppTV App मधून या ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. YuppTV हा जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट टीव्हीपैकी एक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *