महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१८ मार्च । मुंबई । गावांमध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच बोपखेल गावामध्ये कायदा व सुव्यस्था राखली जावी यासाठी पोलिस खात्यामार्फत योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे आग्रही मागणी करण्यात आली.
बोपखेल गावांमध्ये पोलीस चौकीची नितांत आवश्यकता असून, बोपखेल गणेश नगर रामनगर परिसराच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात याव्यात. गावामध्ये पोलीस चौकी निर्माण करून गावांमध्ये शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस खात्यामार्फत योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी करण्यात आली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत घुले यांनी महाराष्ट्र 24 ला दिली.