पहिल्या सामन्यासाठी विराटसेना सज्ज ; रोहितबरोबर ओपनिंग करणार का ?, विराटचं उत्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २३ – पुणे – आगामी टी ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये (T 20 World Cup) रोहित शर्माबरोबर (Rohit Sharma) ओपनिंग बॅटिंग करणार का?, या प्रश्नावर कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) बेधडक उत्तर दिलं. आम्हाला एकमेकांच्या साथीने बॅटिंग करायला आवडत, असं उत्तर विराट कोहलीने दिलं. मात्र टी ट्वेन्टी वर्ल्ड कपमध्ये ओपनिंग करणार का?, यावर मात्र ‘आताच गॅरंटी देऊ शकत नाही’, असं तो म्हणाला. (Will Virat Kohli open with Rohit in T20 World Cup? )

इंग्लंडविरोधात पाचव्या आणि अंतिम टी ट्वेन्टी सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माने ओपनिंग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, जो निर्णय हिट साबित झाला. रोहित शर्माने सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आक्रमक बॅटिंग केली तर विराट कोहलीने सिंगल-डबल धावा काढून त्याला स्ट्राईक दिली.

रोहित विराटचा ओपनिंग फॉर्म्युला यशस्वी झाल्यानंतर क्रिकेट विश्वात याच ओपनिंग जोडीची चर्चा सुरु आहे. किंबहुना याच जोडीने आगामी टी ट्वेन्टी विश्वचषकात ओपनिंग बॅटिंग करावी, अशी मतं काही एक्सपर्ट मांडत आहे. याच चर्चांवर उत्तर देताना विराटने तसा काही सध्या प्लॅन नाही. पण रोहित आणि मला एकत्र बॅटिंग करायला आवडतं. आपल्या पार्टनरशीप करायला आवडतात. तसंच आम्ही एकत्र खेळल्यानंतर रिझल्टही दिसतात, असं विराट म्हणाला.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या सामन्यात ओपनिंग बॅटिंग फॉर्म्युला पुढेही सुरु राहिल, असं सध्या तरी सांगू शकत नाही. मंगळवारपासून पाहुण्या इंग्लंडविरोधात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु होत आहे. या सामन्यांत मात्र रोहित आणि शिखर डावाला सुरुवात करतील, असं विराट म्हणाला.

रोहित आणि शिखर डावाची सुरुवात करणार
‘हिटमॅन’ रोहित शर्मा (Rohit Sharma)आणि ‘गब्बर’ शिखर धवन (Shikhar Dhawan) ही जोडी या मालिकेत सलामी करणार आहेत. याबाबतची माहिती विराटने दिली. पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विराट बोलत होता.

सूर्या खेळणार का? विराट म्हणतो…
मुंबईकर सूर्यकुमार यादवने टी 20 मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याला या कामिगरीच्या जोरावर एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं. सूर्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी द्यायची की नाही,याबाबत आम्ही ठरवू”, असं विराटने नमूद केलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *