या महिन्यात होणार एअर इंडियाचं खाजगीकरण, मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – नवीदिल्ली -एअर इंडियाचे मे अखेरपर्यंत खाजगीकरण (Air India Privatisation) होणं जवळपास निश्चित झालेले आहे. नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज ही माहिती दिली आहे. एअर इंडियाचा १०० टक्के हिस्सा विकला जाईल, असेही पुरी म्हणाले आहेत. एअर इंडिया इतकी डबघाईला गेली आहे की, एकतर ती बंद करणे किंवा विकणे याव्यतिरिक्त केंद्र सरकारकडे (Central Government) कोणतेही पर्याय उरलेले नाहीत. त्यामुळे त्याची १०० टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय निश्चित झाला आहे. ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी हे वक्तव्य केलेले आहे.

एअर इंडियावर सध्या ६० हजार कोटींचे कर्ज (Air India debts) आहे. आणि हाच कर्जाचा बोजा कंपनीचे खाजगीकरण केल्याशिवाय कमी होणार नाही, असं मत सरकारचे आहे. एअर इंडिया कुणाला विकायची याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र याची बोली लावण्यासाठी कंपन्यांना ६४ दिवसांचा कालावधी दिल्याचे पुरी म्हणाले आहेत. त्यामुळे मे अखेर किंवा जूनच्या सुरूवातीपर्यंत एअर इंडियाचे खाजगीकरण झालेले असेल, हे निश्चित होते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *