Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
सोनं खरेदीसाठी योग्य काळ ; सोनं दर ४५,००० च्या आसपास , पाहा आजचे दर - Maharashtra 24

सोनं खरेदीसाठी योग्य काळ ; सोनं दर ४५,००० च्या आसपास , पाहा आजचे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ३ एप्रिल ।सोन्या चांदीची आभूषणे शरीराची शोभा वाढवतात. सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याचांदीच्या आभुषणांचा पेहराव आपल्याकडे शुभ मानला जातो. सोन्याने साठी पार केल्याने सर्वसामान्य जनतेला सोन घेणं शक्य होत नव्हतं. पण आता सोनं पुन्हा पंचेचाळीस च्या आत आलंय. त्यामुळे सोनं खरेदीसाठी पुन्हा गर्दी पाहायला मिळतेय.

गुड रिटर्न वेबसाईट नुसार , १ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४,३९१ इतकी आहे. हा दर काल ४,३९० इतका होता. ज्यात १ रुपयांनी वाढ पाहायला मिळाली. १० ग्रॅम सोन्याची किंमत ४३,९१० रुपये आहे. काल ही किंमत ४३,९०० रुपये इतकी होती. यामध्ये सरासरी १० रुपयांची घट पाहायला मिळाली.

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याची किंमत आज ४,४९१ इतकी आहे. हा दर काल ४,४९० इतका होता. ज्यात १ रुपयांनी वाढ पाहायला मिळाली. १० ग्रॅम सोन्याची किंमत ४४, ९१० रुपये आहे. काल ही किंमत ४४,९०० रुपये इतकी होती. यामध्ये सरासरी १० रुपयांची वाढ पाहायला मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *