महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ४ एप्रिल ।दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान (South Africa vs Pakistan 2nd ODI) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम बॅटिंग करताना पाकिस्तानच्या बोलर्सला फोडून काढलं. निर्धारित 50 ओव्हर्समध्ये आफ्रिकेने 341 रन्स काढले.
प्रत्त्युतरादाखल पाकिस्तान संघाने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 324 धावा काढल्या. पाकिस्तानला या सामन्यात 17 रन्सने पराभव स्वीकारावा लागला. पण पाकिस्तानचा फखर झमान ज्या पद्धतीने खेळला, त्याचा खेळ पाहून क्रिकेट वेड्या प्रेक्षकांचं मन तृप्त झालं. दक्षिण आफ्रिकन बोलर्सवर त्याने ज्या पद्धतीने आक्रमण केलं, ते लाजवाब होतं. मोठा स्कोअर असताना, लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल आणि तेव्हा आक्रमण कसं असावं, याचा वस्तुपाठ काल फकरने घालून दिला. त्याने केवळ 155 चेंडूत 193 धावा फटकावल्या. या खेळीला त्याने 18 चौकार आणि 10 षटकारांचा साज चढवला. त्यांचं व्दिशतक केवळ 7 धावांनी हुकलं.
मैदानात फकर झमानचं वादळ आलं होतं. आफ्रिकन बोलर्सने त्याला आऊट करण्यासाठी जंग जंग पछाडलं. पण काही केल्या तो आऊट होत नव्हता. फकरने आफ्रिकन बोलर्सची डाळ शिजू दिली नाही. संधी मिळेल तेव्हा तो आक्रमण करत राहिला. 190 धावा क्रॉस केल्यानंतर त्याने सावध पवित्रा घेतला. 50 व्या ओव्हर्सच्या पहिल्या चेंडूवर त्याने जोरदार फटका मारला. एक धाव पूर्ण केल्यानंतर तो दुसऱ्या धावेसाठी पळाला. जेव्हा तो दुसऱ्या धावेसाठी धावत होता तेव्हा चतुर डिकॉकने फकरला गाफिल ठेवण्यासाठी फिल्डर्सला नॉन स्टायकर एंडला बॉल फेकण्यासाठी सांगितलं.
डिकॉकचा प्लॅन फत्ते झाला. डिकॉकच्या इशाऱ्याकडे फकरने पाहिलं आणि त्यालाही वाटलं आता फिल्डर नॉन स्टायकर एंडला बॉल फेकणार… पण फिल्डरने डिकॉकच्या दिशेने बॉल फेकला आणि त्या बॉलने बरोबर स्टम्पचा वेध घेतला…. फकरची 193 धावांची झुंजार इनिंग संपुष्टात आली…! डिकॉकची फेक फिल्डिंग कामाला आली. फकर झमानच्या झुंजार खेळीबद्दल त्याला ‘मॅच ऑफ द मॅच’च्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.
De Kock 😹😹 Pro Version Of Sanga.
Well Played Fakhar Zaman. pic.twitter.com/CwPOIpalRI
— Ravi Mishra (@G33kBoyRavi) April 4, 2021
डिकॉकने आपल्या संघासाठी चतुर खेळी केली खरी पण चाहत्यांना डिकॉकचा चतुरपणा आवडला नाही. डिकॉकने मॅच स्पिरीट पाळलं नसल्याचा आरोप पाकिस्तानच्या चाहत्यांनी ट्विटरवर केलाय. डिकॉकच्या विरोधात पाकिस्तानी चाहत्यांनी कित्येक ट्विट केलेत.