पुण्यातील व्यापारी म्हणतात आम्ही दुकानं उघडणार ; आयुक्तांचा कारवाई चा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ९ एप्रिल ।राज्यात लागू करण्यात आलेल्या कोरोना निर्बंधांमुळे आक्रमक झालेल्या व्यापारी वर्गाने पुण्यातील दुकाने उघडण्याचा चंग बांधला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचे (Pune Coronavirus) आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील दुकाने उघडल्यास कारवाई करण्याचा इशारा व्यापाऱ्यांना दिला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात अनेक ठिकाणी व्यापारी वर्ग आक्रमक झाला आहे. पुण्यातील व्यापारीही त्याला अपवाद नाहीत. पुणे महानगरपालिकेकडून शहरातील अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाविरोधात शहरातील व्यापारी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज आपली दुकाने सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडण्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यास राज्य शासनाच्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल, असा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला. तसेच शहरात घातलेल्या निर्बंधांची अधिक कडक अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेकडून पोलिसांना आणखी काही अधिकार दिले जाणार असल्याचेही आयुक्‍तांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *