महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ९ एप्रिल ।जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे जुने धोरण रद्द करण्यात आले आहे. आता नव्या नियमानुसार प्रत्येक शिक्षकाला एकाच शाळेत किमान पाच वर्षे रहावे लागणार आहे. या धोरणामुळे शिक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.
शालेय शिक्षण विभागाने 2017 मध्ये बदली धोरण जाहीर केले यावर विविध मते जाणून राज्य सरकारने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे नवीन धोरण जाहीर केले आहे. नव्या धोरणात अवघड क्षेत्रातील शाळा निश्चितीचे निकष बदलण्यात आले आहेत. यामुळे अवघड क्षेत्रातील शाळांची संख्या मोठय़ा प्रमाणात कमी होणार आहे. 2017 मधील धोरणानुसार राज्यस्तरावरुन ऑनलाइन पद्धतीने बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती. या निर्णयाला शेकडो शिक्षकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. यानंतर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऩयांचा समावेश असेलेली समिती स्थापन केली होती. या समितीच्या शिफारसीनुसार नवीन धोरण निश्चित करण्यात आले.
नवीन धोरणानुसार एका शाळेवर किमान पाच वर्षे सेवा अनिर्वाय.
बदलीसाठी 30 शाळांचा पसंतीक्रम देता येणार
अवघड क्षेत्रातील शिक्षकांना तीन वर्षांनंतर बदलीचे अधिकार मिळणार
बदली प्रक्रियेविषयी शिक्षकांना प्रशिक्षण देणार.
संवर्ग एक आणि दोनच्या पात्र शिक्षकांच्या याद्या बदलीपूर्वी प्रसिद्ध करणार.