आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली ; कोरोना महामारी सोडवण्यात आपण कमी पडत आहोत असा निष्कर्ष बाहेरील देशांनी काढला ; .पि.के.महाजन जेष्ठ कर सल्लागार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पिंपरी चिंचवड । दि.२८ एप्रिल। आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे सत्ताधारी-विरोधकांसहीत संपूर्ण देशवासियांना….कोरोना महामारी हे जागतीक संकट आहे ते सोडवण्यात आपण कमी पडत आहोत असा निष्कर्ष बाहेरील देशांनी (परकीय) काढलेला आहे ….परकीयांनी निष्कर्ष काढला म्हणजे आपण शंभर टक्के चूकलो आहोत असही समजण्याचे कारण नाही….कारण की इतर देशाच्या तुलनेत आपला देश लोकसंख्येने खूपच मोठा आहे म्हणून हे संकट निस्तरायला आपण कुठेना कूठे तरी कमी पडत आहोत हे कबूल करून त्यावर निश्चितच आत्मपरीक्षण करून नियोजन क्रियाशील असा आराखडा आखून त्याची शिस्तबद्ध अंमलबजावणी करायची वेळ आली आहे….. कारण आतापर्यंत आपलेच आपल्या कारभारावर टिका करीत होते…. सत्ताधाऱ्यांवर विरोधकांकडून टिका होणे जनता समजू शकते परंतू परकीय..

परदेशी तर आपले विरोधक नाहीत…..ते जेव्हा आपल्या वर्तमान कारभारावर व ध्येय धोरणांवर टिका करीत आहेत म्हणजे आपले नक्कीच काहीतरी कुठेतरी चुकतय हे आधी आपण सर्व राजकीय पक्षांनी व प्रशासन चालवणाऱ्या शासकीय अधीकारी वर्गाने व देशातील जनतेने कबूल केले पाहिजे…..जनतेने सुद्धा एवढ्या साठी म्हणावे लागते कारण की सरकार इतकेच जनताही त्यास जबाबदार आहे…कारणे कोणतेही असोत परंतू सत्ताधारी सरकार , विरोधक तसेच ज्यांना लोक देव मानतात ते डॉक्टर सहीत त्यांचे सहकारी व देशातील संपूर्ण देशवासीयांनी कोरोना महामारी चे गांभीर्य ओळखून आपापले कर्तव्य चोखपणे बजावण्या ची वेळ आली आहे नाहीतर आपण जगाच्या तुलनेत निश्चितच मागे पडू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *