तर T20 वर्ल्ड कपसाठी पर्याय म्हणून यूएईची चाचपणी सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । निखिल गाडे । दि.२९ एप्रिल। मुंबई । यंदाचा टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हिंदुस्थानात होणार आहे. मात्र, सध्या कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे हिंदुस्थानात हाहाकार उडाला आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी अद्यापि सहा महिन्यांचा अवधी असला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पर्याय म्हणून यूएईची चाचपणी सुरू केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हिंदुस्थानात आता बेड शिल्लक राहिलेले नाहीत. ही परिस्थिती कधी अटोक्यात येईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी आयसीसीने ‘बी’ प्लॅन तयार केल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र, हिंदुस्थानमध्ये हा वर्ल्ड कप व्हावा यासाठी ही स्पर्धा महिनाभर पुढे ढकलण्याची तयारीही ‘आयसीसी’ने केली आहे. मात्र, पर्यायी व्यवस्था म्हणून यूएईलाच ‘आयसीसी’चे प्राधान्य असल्याचे समजले.

यूएईमध्ये लोकसंख्या कमी असल्याने येथे टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करणे सहज शक्य होणार आहे. याचबरोबर ‘बीसीसीआय’ आणि अमिरात क्रिकेट बोर्ड यांचे संबंध चांगले असल्याने यूएईमध्ये टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यास अडचण येणार नाही याची ‘आयसीसी’ला कल्पना आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीची ‘आयपीएल’ स्पर्धा ही बायो-बबल वातावरणात यूएईमध्येच झाली होती. त्यामुळे तेथील स्टेडियम्स आणि एकूणच परिस्थितीचा ‘बीसीसीआय’ व आयसीसीला अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *