महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । अमित लगस । दि.२९ एप्रिल। मुंबई । आयपीएलमध्ये उद्या मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स हे संघ आमने – सामने उभे ठाकणार आहेत. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने मागील दोन मोसमांत ही स्पर्धा जिंकण्याची करामत केली असली तरी यंदा हिंदुस्थानात सुरू असलेल्या आयपीएलमध्ये या संघाला प्रतिमेला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या पाच लढतींमधून फक्त दोनच लढतींत मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आला आहे. संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सलाही पाच सामन्यांमधून अवघ्या दोनच लढतींत विजय संपादन करता आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही संघ उद्या एकमेकांना भिडतील तेव्हा या मोसमातील तिसरा विजय मिळवण्यासाठी जिवाचे रान करतील यात शंका नाही.
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स; नवी दिल्ली, दुपारी 3.30 वाजता