IPL 2021: जोपर्यंत चेन्नई संघातील सर्व खेळाडू त्यांच्या घरी जाण्यासाठी रवाना होत नाहीत तोपर्यंत या कर्णधाराने घरी जाण्यास दिला नकार;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.६ मे । नवीदिल्ली ।करोना व्हायरसच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आयपीएलचा १४वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे. स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ घरी जात आहेत. अनेक परदेशी खेळाडूंना घरी जाण्यास अडचणी येत आहेत. अशात एका कर्णधारने नवा आदर्श घालून दिलाय.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने असा एक निर्णय घेतला ज्याने तो महान खेळाडू का आहे याचे उत्तर पुन्हा एकदा मिळाले. जोपर्यंत चेन्नई संघातील सर्व खेळाडू त्यांच्या घरी जाण्यासाठी रवाना होत नाहीत तोपर्यंत धोनीने हॉटेलमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ चेन्नई संघातील हॉटेल सोडणारा शेवटचा खेळाडू धोनी असेल. चेन्नई संगात फाड डु प्लेसिस आणि ड्वेन ब्राव्हो सारखे परदेशी खेळाडू देखील आहेत.

धोनीने आधीच स्पष्ट केले की सर्वात आधी परदेशी खेळाडूंना घरी सोडण्यास प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर भारतीय खेळाडूंना घरी सोडले जाईल. धोनी सध्या दिल्लीच्या हॉटेलमध्ये संघा सोबत आहे.

सीएसके संघातील एका सदस्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, त्याने (धोनी) आधीच स्पष्ट केले आहे की हॉटेल सोडणारा तो शेवटचा व्यक्ती असेल. धोनीला सर्व परदेशी खेळाडूंना आधी घरी पाठवायचे होते. त्यानंतर भारतीय खेळाडूांना घरी पाठवावे. उद्या शुक्रवारी जेव्हा सर्व जण घरी सुरक्षितपणे पोहचतील तेव्हा धोनी हॉटेलमधून बाहेर पडेल आणि स्वत:च्या घरी जाईल.

चेन्नई संघातील गोलंदाजीचे प्रशिक्षक बालाजी याला करोनाची लागण झाली होती. त्याच बरोबर संघाचे सीईओ काशी विश्वनाथन आणि खेळाडू ज्या बसमधून प्रवास करत होते त्याच्या क्लिनरला देखील करोना झाला होता. आयपीएलमधील बायो बबलमधील खेळाडूंना करोना झाल्याने बीसीसीआयने मंगळवारी ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *