आ.रावसाहेब अंतापूरकर गेले पण जनतेचे वचन पूर्ण केले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.६ मे । नांदेड । संजीवकुमार गायकवाड । जिल्यातील देगलूर बिलोली मतदार संघाचे विधानसभा सदस्य आ.रावसाहेब अंतापूरकर यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतुन देगलुर बिलोली मतदारसंघातील गंभीर रुग्णांना देगलुर बिलोली तसेच नांदेड या ठिकाणी नेण्यासाठी आमदार निधीतून पाच रुग्णवाहिका मंजुर केल्या होत्या. त्या रुग्णवाहिकेंचे लोकार्पण विधान परिषद प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर साहेब व जितेशजी अंतापुरकर विविध यांच्या हस्ते करण्यात आले.या रुग्णवाहिका देगलूर तालुक्यातील मरखेल,हणेगाव,शहापुर तसेच बिलोली तालुक्यातील सगरोळी, लोहगाव या ठिकाणी असणाऱ्या शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अतिशय जलदगतीने हा निर्णय स्व.आ.रावसाहेब अंतापूरकर साहेब यांनी घेतला होता. या निर्णयाचे समाजमनातून स्वागत होत आहे.गरजू रुग्णांना प्राण वाचवण्यासाठी आवश्यक त्या सेवा वेळेत मिळण्यासाठी या सुविधेचा खूप फायदा होणार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बिलोली मतदारसंघाचे विद्यमान आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर यांचे १० एप्रिल रोजी शनिवारी पहाटे मुंबईत निधन झाले. परंतु संपूर्ण जनता आदल्या दिवशी दुपारपासूनच अस्वस्थ झाली होती. त्यांचे सुपुत्र जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी ९ एप्रिल रोजी रात्री पावणे अकरा वाजता ही घटना घडल्याचे फेसबुक वरुन जाहीर केले होते. सामान्यांशी नाळ जोडलेला आणि तळागाळात जाऊन काम करणारा नेता म्हणून रावसाहेब अंतापूरकर यांची ओळख होती. एरवी साधा नगरसेवक म्हटलं तरी त्या नेत्याच्या श्रीमंतीचा थाट डोळे दिपवणारा असतो.मात्र, रावसाहेब अंतापूरकर यांनी कधीही बडेजाव न मिरवता शेवटपर्यंत आपला साधेपणा जपला.एवढंच काय दोनवेळा आमदारकीची निवडणूक जिंकलेल्या रावसाहेब अंतापूरकर यांचा मुक्काम शेवटपर्यंत भाड्याच्या घरातच होता. कोरोनाच्या काळातही अंतापूरकर यांच्या कामात खंड पडला नव्हता.अगदी शेती- बांध्यावर, वाडी-तांड्यावर जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते.अशातच त्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यामुळे एक हळव्या मनाचा आमदार आपल्यापासून हिरावला गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *