महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पिंपरी चिंचवड । दि. १० मे । पि.चि. महानगरपालिकेतील दिघी गावकऱ्यांनी राजकीय जोडे- हेवे दावे बाजूला ठेवून सर्व पक्षांचे आजी माजी लोक प्रतिनिधी, पदाधिकारी व अनेक सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते एकत्र येऊन दिघी गाव कोरोना मुक्त करण्यासाठी…दि. 08 .05. 2021 रोजी ” दिघीगांव कोरोना मुक्त समीती ” स्थापन केली आहे. सदर समीतीने दिघीगांव कोरोना मुक्त करण्याचा चंग बाधून त्या साठी भाजी विक्रेते, फळ विक्रेते व व्यापारी वर्गात कोरोना विषयी जन जागृती करण्याचे काम सूरू केले आहे. कोरोना झाला तरी भयभीत न होतो कोरोनाला हरवण्याचे धाडस निर्माण करण्याचे काम समीतीने सुरू केले आहे. सर्व नागरिकांना विनामूल्य कोरोना तपासणी (ANTIGEN) चे काम सूरू केले आहे.
तपासणी नंतर जे जे रूण कोरोना बाधीत असतील त्यांना लागणारे पुढील उपचार कशाप्रकारे आवश्यक राहतील त्या नुसार त्याची जबाबदारी समीतीतील कार्यकारिणी सदस्यांनी टप्या टप्याने जबाबदारी पुर्वक वाटून घेतली आहे आणि त्यानुसार काम सुरू केले आहे….. उदाहरणार्थ तपासणी नंतर कोरोना बाधीत तीव्रतेनुसार रुग्णाला डाॅ. सुचवतील त्या नुसार रुग्णाला घरीच औषधोपचार द्यायचे की रुग्णालयात दाखल करायचे ….त्या प्रमाणे लागणारी आवश्यक मदत करने…..उदाहरणार्थ योग्य ते नुसार हॉस्पीटल सुचवने, अॅमबयुलनस ची सोय करने ….अॅडमिट केल्यावर इंजेक्शन, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर सारख्या अत्यावश्यक सुवीधा उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करने, रुग्णाची जेवणाची सोय नसेल तर त्या साठी जेवण पोहचवने….रूण पुर्णपने बरा होई पर्यंत त्याकडे लक्ष ठेवून त्याची माहीती त्याच्या घरच्यांनाही देने…….दुर्दैवाने रूग्ण दगावलाच तर त्याच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी.. अॅमबयुलनस पासून ते स्मशान भूमीतअंत्यविधी पुर्ण होईपर्यंतंची कामे ही समीती जबाबदारीने पार पाडणार आहे….अशी माहीती समितीतील पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतातून दिली आहे……. मोफत तपासणी व पुढील मदतीसाठी सोबत माहीती पत्रक, समीती सदस्यांचे नाव व संपर्क नंबर दिलेले आहेत…त्यावर दिघी गावातील नागरिकांनीच मदतीसाठी संपर्क करण्याचे आव्हाहन करण्यात आले आहे.