महाराष्ट्र २४- नवी दिल्ली : संपूर्ण देशात महागाईचा भडका उडाला आहे. त्यातच सामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री बसण्याची शक्यता आहे. रोजच्या जीवनातील एका महत्त्वपूर्ण गोष्टीच्या किंमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. देशातील नामांकित कंपनी ‘अमूल’ (Amul) दुधाचे दर वाढवण्याची शक्यता आहे. अमूल दुधाच्या दरात 4 ते 5 रुपयांची तर अमूलच्या दूध उत्पादनांच्या दरात 7 ते 8 रुपयांची वाढ होऊ शकते. ज्या कंपन्यांकडे दूध जास्त पुरवठ्याची क्षमता आहे त्यांना 2020मध्ये मोठा फायदा होईल .
दरवाढीची कारणं दूध उत्पादक कंपन्यांनी गेल्या 3 वर्षात दोनवेळा दुधाचे दर वाढवले आहेत. याचा परिणाम दुध उत्पादक शेतकऱ्याच्या वार्षिक उत्पन्नावर झाला आहे. शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न 2018च्या तुलनेत 25 ते 30 टक्क्यांनी वाढलं आहे. 2019मध्ये मदर डेअरी या दूध कंपनीने दूधाच्या दरात 3 रुपयांची वाढ केली होती तर अमूलने सुद्धा 2 दूधदरात रुपयांची वाढ केल्याची घोषणा केली होती. अमूलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षात 2 वेळा दुधाच्या किंमतीत बदल केला आहे. जनावरांना घालण्यात येणाऱ्या चाऱ्याच्या किंमतीत यंदा काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे दूध उत्पादनासाठी लागणाऱ्या इतर घटकांच्या किंमतीही वाढल्या आहेत. परिणामी दुधाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय अमूलकडून घेण्यात आला आहे.