अक्षय्य तृतीये निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मनमोहक आरास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १४ मे । साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हापूस आंबा व पानांचा वापर करून सजावट करण्यात आल्याने श्री च्या गाभाऱ्यात आमराई अवतरल्याचे दिसत आहे. ही मनमोहक आरास श्री विठ्ठल भक्त विनायकशेठ काची- बुंदेले, पुणे यांनी मोफत सेवा केली आहे. याकरिता हापूस आंबा, आंब्याची पाने व इतर फळांचा रस वापर करण्यात आला आहे. यामुळे मंदिरातील श्रीं चा गाभारा व चौखांबी आमराई ने नटली आहे. ​श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आज (शुक्रवार) अक्षय तृतीया निमीत्त श्री विठ्ठलरूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी आमराईची आरास करण्यात आली आहे. यामुळे मंदिराचा गाभारा मनमोहक दिसत आहे.

सद्या कोरोनामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी व व्यवस्थापक बालाजी पूदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या आमराईची आरास व श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेत स्थळ व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून घेता येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *