‘तौत्के’ चक्रीवादळ होणार आणखी तीव्र ; किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १६ मे । ‘तौत्के’ चक्रीवादळ पुढील तीन तासात अधिक तीव्र रूप धारण करणार आहे. त्याचा वेग ताशी 115 किमी पर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हे चक्रीवादळ सध्या गोव्यापासून 290 किमी, मुंबईपासून 650 तर गुजरातपासून 880 किमी दूर आहे. हे वादळ आता मुंबई आणि गोव्याच्या दिशेने येत आहे. त्याचा वेग ताशी 13 किमी असून, पुढील तीन तासात त्याची तीव्रता वाढणार आहे. पुढील 12 तासात हे वादळ अतितीव्र रूप धारण करेल.

रविवारी हे वादळ कोकण किनारपट्टीवरून गुजरातच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *