महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २० मे । करोना चाचणी करण्यासाठी आता रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही घरातही रॅपिड अँटिजन किटच्या सहाय्याने करोना चाचणी करु शकता. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएआर) घरच्या घरी करोना चाचणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान याचा वापर कसा आणि कोणी करावा यासंबंधी आयसीएमआरकडून मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्यात आली आहेत.
आयसीएमआरने निर्णय जाहीर करताना ज्यांना लक्षणं आहेत तसंच जे प्रयोगशाळेतील चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांनीच याचा वापर करावा असं स्पष्ट केलं आहे. सरसकट चाचणी करु नका असा सल्ला आयसीएमआरने दिला आहे.
“पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रत्येकाला ट्रू पॉझिटिव्ह म्हणून ग्राह्य धरलं जाईल आणि पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही. लक्षंण नसणारे जे रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये निगेटिव्ह आले आहेत त्यांनी तात्काळ आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यावी,” असं आयसीएमआरने सांगितलं आहे.