महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २० मे । मुंबई । कोरोना महामारी थांबवणे सध्या गरजेचे अाहे. अापण जर जगलाे तर अारक्षणासाठी लढा देऊ शकताे. ही वेळ माेर्चा काढण्याची नाही. यातून सामान्य माणसाला त्रास हाेईल. मराठा अारक्षणाबाबत माझी पहिल्यापासूनच संयमाची भूमिका अाहे. समाजातील अनेक घटकांशी, अनेक विद्वानांशी, वकिलांशी चर्चा करणार अाहे. माझी भूमिका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांची भूमिका असणार अाहे. लवकरच मी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती भाेसले यांनी बुधवारी सांगितले.
अारक्षणाबाबत मराठा समाजामध्ये संभ्रमावस्था अाहे. काही संघटनांनी लॉकडाऊन खुले होताच मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. थाेड्या दिवसांतच माझी भूमिका जाहीर करणार अाहे. माझी भूमिका ही समाजाची असेल. अनेक पक्ष त्यांच्या त्यांच्या परीने भूमिका जाहीर करत असले तरी ताे त्यांचा प्रश्न अाहे. केंद्राने राज्याचे अधिकार काढून घेतले का, अॅटर्नी जनरल यांनी काय मत मांडले या सर्वांविषयी मी बाेलणार अाहे. आरक्षण मिळवण्यासाठी ज्या समाजाच्या भावना अाहेत, त्याच माझ्याही असल्याचे ते म्हणाले.