Petrol-Diesel Rates |२ आठवड्यापासून चालू असलेल्या इंधन दरवाढीला आज ब्रेक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ मे । मागच्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज (22 मे) थांबली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी पुरता का होईना सामान्य नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईत काल (21 मे) पेट्रोलचा दर 99.32 रुपये तर डिझेल 91.01 रुपये होता. राजधानी दिल्लीतही काल पेट्रोल 93.04 रुपये आणि डिझेल 83.80 रुपये होतं.

मागच्या 17 दिवसांमध्ये पेट्रोलचे दर हे 2 रुपये 35 पैसे तर डिझेलचे दर 2 रुपये 87 पैशांनी वाढले आहे. त्यामुळे पेट्रोलपाठोपाठ डिझेलही लवकरच शंभरी पार करण्याची शक्यता आहे. सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल हे परभणी जिल्ह्यात असून पेट्रोल 101.71 पैसे, डिझेल 91.93 पैसे या दराने विक्री केली जात आहे. जे कालचेच दर आहेत. केवळ उस्मानाबाद आणि सोलापूर या दोन जिल्ह्यात पेट्रोलने अद्याप शंभरी गाठलेली नाही.

सतत वाढणाऱ्या या इंधनाच्या दरांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे दर मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. याचा परिणाम हा टॅक्सी, ऑटोरिक्षा भाडेवाढ, कृषी माल पुरवठा करणारी वाहन दर, ट्रान्सपोर्टिंगचे दर कमालीचे वाढले असून याचा भार थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर पडत आहे. त्यामुळे सर्वांचेच आर्थिक गणित कोलमडत आहे. वारंवार मागणी करुनही इंधन दरवाढ कमी होत नसल्याने सामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

मागच्या 2 वर्षापासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिक आधीच हैराण झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे ठप्प झाले,रोजगार निर्मिती होत नाही त्यात वाढत जाणारे इंधन दर सामान्य माणसाचं जगणं मात्र मुश्किल करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचं बनलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *