इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेत ‘हा’ संघ 5-0 ने जिंकेल ; या फिरकी गोलंदाजांची भविष्यवाणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ मे । इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसरने (Monty Panesar) या दौऱ्याबाबत मोठी भविष्यवाणी वर्तवली आहे. (England Former bowler Monty Panesar Prediction India vs England test Series)

माँन्टी पनेसरची मोठी भविष्यवाणी
“भारतीय संघ अतिशय योग्य वेळी इंग्लंडचा दौरा करत आहे. कारण भारतीय संघातले सगळेच खेळाडू तुफान फॉर्मात आहेत. ऑगस्ट महिन्यात इंग्लंडमधील वातावरणात गरमी असेल. याचाच फायदा भारतीय संघ घेऊ शकतो. संघात दोन फिरकीपटूंना संधी देऊन इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 5-0 म्हणजेच क्लिन स्वीप देण्याची धमक भारतीय संघात आहे, अशी भविष्यवाणी माँन्टी पनेसरने केली आहे.

…तर विदेशातला सगळ्यात मोठा विजय
“भारतीय संघातील खेळाडू दमदार आहेत तसंच तुफान फॉर्मात देखील आहेत. त्यामुळे इंग्लंडला पाच सामन्यांच्या मालिकेत 5-0 असं हरवून भारत क्लिन स्वीप देऊ शकतो, तशी ताकद भारतीय संघात आहे. जर भारतीय संघाने अशी कामगिरी केली तर विदेशात भारतासाठी हा सगळ्यात मोठा विजय असेल”, असंही माँटी म्हणाला.

असा असेल इंग्लंड दौरा
जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 18 ते 22 जून, साउथ्मपटन

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नाग्वासवाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *