‘या’ राशीच्या व्यक्तींवर असेल सूर्यनारायणाची कृपा , आजचं राशीभविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २३ मे ।

मेष- आज आपण पुढे वाटचाल कराल. आपल्या जीवनात प्रगतीचे मार्ग अधिक सुखकर होतील. आर्थिक बळकटी मिळेल.  नोकरी क्षेत्रात सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल.

वृषभ- आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती अधिक मजबूत करण्यावर भर द्यायला हवा. सतर्क राहाणं गरजेचं आहे.आपण प्रतिकूल परिस्थितीतून जात आहात. आज घराची साफसफाई करा.

मिथुन- आजचागुंतवणूक करताना विशेषत: प्रॉपर्टीच्या गोष्टींमध्ये अधिक लक्ष्य द्या. दिवस आपल्यासाठी संमिश्र स्वरुपाचा असणार आहे.

कर्क- आज आर्थिक तणाव जाणवेल. आजचा दिवस चांगल्या पद्धतीनं घालवण्याकडे लक्ष द्या. आपल्याला अचानक फायदा मिळून शकतो.

सिंह- आजचा दिवस आपला चांगला जाईल. व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. पैशांच्या व्यवहारात साक्षीदार असणं गरजेचं आहे.

कन्या- दूध व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात आज आपल्याला लाभ मिळेल. प्रॅक्टिकल निर्णय घेण्यावर भर द्या. जोडीदारासोबत आपला वेळ खूप चांगला जाईल.

तुळ- आज व्यवहाराचे निर्णय सकारात्मक होतील. आपल्या मुलांसोबत अधिक वेळ घालवा. आपल्याला काम मेहनत घेऊन आणि इमानदारीनं करायचं आहे.

वृश्चिक- नोकरी-व्यवसायात चांगला लाभ होईल. भविष्यातील गुंतवणुकीसाठी नियोजन करा. आजपासून गुंतवणूक करण्यावर भर द्या.विरोधकांपासून सावध राहा.

धनु- आर्थिकबाबींमध्ये सावधानी बाळगा. अपूर्ण राहिलेली कामं आज मार्गी लागतील. यशस्वी होण्यासाठी आज तुम्हाला खूप जास्त प्रयत्न करावे लागतील. धीर सोडू नका.

मकर- आजचा आपला दिवस चांगला जाणार आहे. कुटुंबासोबत आपला वेळ चांगला जाईल. नोकरी बदलण्याचा विचार तुम्ही करू शकता.

कुंभ- आज महत्त्वाच्या भेटीगाठी होतील. आपल्याला दिवसाचं नियोजन करून त्यानुसार वागायला हवं.

मीन- आज आपला विवाह निश्चित होण्याची शक्यता आहे. आज आपण आपलं महत्त्वाची गोष्ट शेअर करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *