महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. ३० मे । देशात लसीकरण सुरू होऊन 134 दिवस झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, देशात आतापर्यंत 21 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात 18 ते 44 वयोगटातील 14.15 लाख लोकांना पहिला आणि 9,075 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झाल्यापासून 1.82 कोटी नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र देशातील एकमेवर राज्य आहे, जिथे 2 कोटींपेक्षा जास्त (2.20) लसीकरण झाले आहे. याशिवाय, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि बिहारमध्ये एक कोटींपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, बिहार, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशने 18 ते 44 वयोगटातील 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना पहिला डोस दिला आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात 21.18 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात 98.61 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला, तर 67.71 लाख कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मिळाला आहे.
याशिवाय, 15.55 कोटी फ्रंटलाइन वर्करला पहिला आणि 84.87 लाखांना दुसरा डोस मिळाला आहे. यात 18-44 वयोगटातील 1.18 कोटींना पहिला आणि 9,373 दुसरा डोस मिळाला आहे. 134व्या दिवशी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 28.09 लाख डोस देण्यात आले. यात 25.11 लाखांनी पहिला आणि 2.98 लाखांनी दुसरा डोस घेतला.