नवीन नोट; रिझर्व्ह बँक लवकरच जारी करणार 100 रुपयांची नवीन नोट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. ३० मे । 100 रुपयांची नवीन नोट भारतीय रिझर्व्ह बँक आणणार आहे. याची खासियत म्हणजे ही नोट चमकदार असणार आहे. त्याचबरोबर ही नोट टिकाऊ असेल. ही नोट मोठ्या प्रमाणात भारतीय चलनात आणण्यात येणार आहे. ही नवीन नोट वार्निश पेंट केल्याने फाटणार नाही, पाण्यात देखील भिजणार नाही. त्यामुळे ही नोट जपून ठेवण्याची गरज देखील नाही.

दरवर्षी लाखो करोडो रुपयांच्या फाटलेल्या, खराब झालेल्या नोटा रिझर्व्ह बँकेला बदलुन द्याव्या लागतात. त्यातच जगातील अनेक देश प्लॅस्टिकच्या चलनी नोटांचा वापर करीत आहेत. या नोटेचे डिजाईन असे केले आहे, ज्यामुळे हे दृष्टीहीन लोकांना देखील सहजपणे ओळखता येईल. या नोटांच्या चांगल्या क्वालिटीसाठी मुबंईत बँकनोट क्वॉलिटी एश्योरंन्स लॅबोरेटरी स्थापित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *