सनथ जयसूर्या ‘या’ संघाचा मुख्य प्रशिक्षक होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जून ।श्रीलंकेचा माजी दिग्गज सलामीवीर सनथ जयसूर्याची मेलबर्न क्लब संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. 2021-22 हंगामात संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या जयसूर्याचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल. जयसूर्याबरोबर तिलकरत्ने दिलशान आणि उपुल थरंगा हे आधीचे सहकारी व्हिक्टोरिया ईस्टर्न क्रिकेट असोसिएशनमध्ये दाखल झाले आहेत. हे दोन्ही माजी क्रिकेटपटू या क्लबमध्ये खेळाडू म्हणून सहभागी झाले आहेत. आता जयसूर्या या दोन खेळाडूंचा प्रशिक्षक असणार आहे.

मुलग्राव क्लबने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सनथ जयसूर्या बोर्डात आल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. जयसूर्या क्लबच्या ज्येष्ठ आणि युवा खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन करेल अशी आम्हाला मनापासून आशा आहे.”

मुलग्राव क्लबचे अध्यक्ष मालिन पुलेनयेगम म्हणाले, “जयसूर्याबरोबर खेळलेल्या तिलकरत्ने दिलशानने त्याला क्लबशी जोडण्यात आम्हाला खूप मदत केली आहे, आम्ही काही दिवसांपासून दिलशानच्या माध्यमातून जयसूर्याशी संपर्कात होतो. द लीजेंड सीरिज दरम्यानही त्याच्याशी संवाद सुरू होता. त्यात दिलशानने खूप योगदान दिले होते. ”

42 आंतरराष्ट्रीय शतके नाववर असणारा जयसूर्या 1996 च्या विश्वचषकात प्लेअर ऑफ द टूर्नामेंट होता आणि त्याने श्रीलंकेला चॅम्पियन बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 1991 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जयसूर्याने 2011 च्या वनडे विश्वचषकानंतर क्रिकेटला निरोप दिला.

जयसूर्याने श्रीलंकेकडून 110 कसोटी, 445 एकदिवसीय आणि 31 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 6973 धावा, एकदिवसीय सामन्यात 13430 आणि टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 629 धावा केल्या आहेत. याशिवाय कसोटी सामन्यात 98 विकेट्स आणि एकदिवसीय सामन्यात 23 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 19 गडी बाद केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *