महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जून । वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) अंतिम सामन्याला 18 जूनपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. माजी कसोटीपटू अजित आगरकरने (Ajit Agarkar) मोठी भविष्यवाणी केली आहे. भारताकडून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक रन्स कोण करणार? या प्रश्नाचं उत्तर देताना त्याने खास नाव सांगितलं आहे. (Virat kohli Will Maximum Runs in WTC Final Says Ajit Agarkar World test Championship 2021)
सर्वाधिक रन्स कोण करणार?
भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक रन्स कोण करणार, कुणाची बॅट तळपणार, कोण कुणाचं उट्टं काढणार, याच्या खमंग चर्चा सध्या रंगतायत. यातच माजी कसोटीपटू अजित आगरकरला जेव्हा अंतिम सामन्यात सर्वाधिक रन्स कोण करणार, असा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीचं नाव सांगितलं.
सामना कोण जिंकणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान होत असलेल्या अंतिम सामन्यात कोण कुणाला आस्मान दाखवणार, याच्याही चर्चा तितक्याच जोरदारपणे रंगताना दिसून येत आहेत. दिग्गज खेळाडू दोन्ही संघांना पसंती देत आहेत. आगरकरनेही काहीसा अंदाज वर्तवला आहे. सामना कोण जिंकू शकतो, हे आताच सांगणं मुश्किल आहे. कारण दोन्हीही संघ तितकेच ताकदीचे आणि तुल्यबळ आहेत, असं आगरकर म्हणाला.
पुजारा आणि शमी न्यूझीलंडवर भारी, पार्थिवचा अंदाज
दरम्यान या सामन्यात भारताचे दोन खेळाडू न्यूझीलंडवर भारी पडू शकतात, अशी भविष्यवाणी माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलने (Parthiv Patel) केली आहे. हे खेळाडू म्हणजे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि गोलंदाज मोहम्मद शमी…!