Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत वाढ , पहा आजचा दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जून । आज सोन्यासह चांदीच्या किंमतीमध्येही जबरदस्त उसळी पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) शुक्रवारी ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 0.20 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. आज एमसीएक्सवर (MCX) सोन्याच्या वायदे किंमतीत 0.20 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर सोन्याचे दर 49,296 रुपये प्रति तोळा झाले आहेत. चांदीच्या दरात एमसीएक्सवर 0.51 टक्क्यांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर चांदीचे दर प्रति किलो 72,367 रुपये झाली आहे.

रेकॉर्ड लेव्हलपेक्षा स्वस्त झालं आहे सोनं
तसं पाहिलं तर सोन्याचे दर रेकॉर्ड लेव्हलवरुन 7000 रुपयांनी कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचले होते. या रेकॉर्ड हायपेक्षा आता जवळपास 7000 रुपयांनी सोन्याचे दर कमी आहेत.

कशाप्रकारे तपासाल सोन्याची शुद्धता?

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *