महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जून । शनिवारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ केली, ज्यामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रतिलीटरमागील किंमतीत वाढ झाली आहे. भारतीय बाजारात पेट्रोलचे दर शनिवारी 27 पैसे प्रतिलीटर आणि डिझेलचे दर 23 पैसे प्रतिलीटर किंमतीनं वाढले.
तेलाच्या किंमतीत झालेली वाढ पाहता दिल्लीत पेट्रोलचे दर 96.12 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचे दर 86.98 रुपये प्रतिलीटर इतक्या किंमतीनं वाढले. मुंबईत पेट्रोचे दर प्रतिलीटरमागे 102.30 रुपयांवर पोहोचले.
देशातील महत्त्वाच्या शहांतील इंधनाचे दर (प्रतिलीटर)
दिल्ली – 96.12 पेट्रोल, 86.98 डिझेल
कोलकाता – 96.06 पेट्रोल, 89.83 डिझेल
मुंबई – 102.30 पेट्रोल, 94.39 डिझेल
चेन्नई- 97.43 पेट्रोल, 91.64 डिझेल
शुक्रवारीही महागलेलं इंधन
एक दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारीसुद्धा पेट्रोल- डिझेलचे दर तेल कंपन्यांकडून वाढवण्यात आले होते. पेट्रोल 29 पैसे आणि डिझेल 28 पैसे या दरानं वाढलं होतं. 4 मे पासून 12 मे पर्यंत जवळपास 23 वेळा पेट्रोलचे दर वाढवण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे इंधनाच्या दरांनी विक्रमी उंची गाठली आहे.