उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे लोकार्पण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ जून । जिल्हा प्रशासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व हिराबाई बुटाला विचार मंच यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ऑक्सिचेन व ऑक्सिवीन ॲपचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन पुणे येथे करण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, हिराबाई बुटाला विचार मंचचे कौस्तुभ बुटाला व पदाधिकारी उपस्थित होते.

ऑक्सिचेन ॲपचा उपयोग ऑक्सिजन पुरवठा साखळी व्यवस्थित करण्यासाठी आणि सद्यस्थितीत मागणी पुरवठा परिस्थिती अंदाज घेण्यासाठी होणार आहे. या ॲपमध्ये जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक, रिफिलर्स, वितरक आणि रूग्णालय यांचा समावेश आहे. ऑक्सिवीन ॲपमध्ये संग्रहित डॅशबोर्ड आहे, ज्यामध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशनवर आधारित डेटा तीन रंगाच्या श्रेणीमध्ये समाविष्ट केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *