Electric टू व्हिलर्सच्या किमतीत होणार मोठी कपात; सरकारकडून या स्कीममध्ये बदल,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जून । पेट्रोल-डिझेलच्या (Price Hike in Petrol Diesel) किमती गगनाला भिडल्या आहेत. याचदरम्यान आता एक चांगली बातमी समोर आली आहे. देशात इलेक्ट्रिक कार-बाईकसह, इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करणं आता स्वस्त होणार आहे. सरकारकडून फेम-2 (FAME-2) स्कीममध्ये केलेल्या बदलांमुळे हे शक्य होणार आहे. इलेक्ट्रिक टू व्हिलर्स, थ्री व्हिलर्स आणि बसेससाठी ग्राहकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने सरकारने हे बदल केले आहेत.

नव्या बदलांनंतर आता इलेक्ट्रिक टू व्हिलर्ससाठी (Electric Two Wheelers) इन्सेंव्हिट अमाउंट (Incentive Amount) 10000 रुपयांनी वाढवून, 15000 रुपये प्रति किलोवॅट करण्यात आली आहे. परंतु आणखी एक निर्णय, या निर्णयाला अधिक फायद्याचं ठरवत आहे. सरकारने इलेक्ट्रिक टू व्हिलर्ससाठी इन्सेंव्हिट अमाउंट फिक्स्ड केली आहे, जी गाडीच्या किमतीच्या 40 टक्के केली आहे. ही अमाउंट मागील मर्यादेच्या 20 टक्क्यांहून दुप्पट आहे.

फेम-2 मध्ये केलेल्या बदलांमध्ये इन्सेंव्हिट अमाउंट वाढवण्याचा अर्थ म्हणजे 1 किलोवॅटची बॅटरी असणाऱ्या इलेक्ट्रिक टू व्हिलरवर 15000 रुपये इन्सेंव्हिट मिळणार आहे. 2 किलोवॅट बॅटरी असणाऱ्या टू व्हिलरवर 30000 रुपये आणि 3 किलोवॅट बॅटरीवाल्या टू व्हिलरवर 45000 रुपयांचा इन्सेंव्हिट मिळेल. यामुळे इलेक्ट्रिक टू व्हिलरच्या किमतीत कंपनीच्या मार्जिनच्या हिशोबाने मोठी कमी येईल.

तसंच, इलेक्ट्रिक बसेससाठी आता 40 लाखहून अधिक लोकसंख्या असलेल्या अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, मुंबई यासारख्या शहरांना लक्ष्य केलं जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *