WTC INDvsNZ : पावसासंदर्भात मोठी अपडेट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ -ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. 22 जून – ICC World Test Championship Final 2021 : पावासाच्या व्यत्ययामुळे विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचे जवळपास तीन दिवस वाया गेले आहेत. पहिला आणि चौथा दिवस पुर्णपणे पावसामुळे वाया गेला तर दुसऱ्या दिवशी 64 आणि तिसऱ्या दिवशी 76 षटकांचा खेळ झाला. कोसोटीचा निकाल उर्वरित दोन दिवसांवर आहे. पण या दोन्ही दिवशी साउदम्टनमधील वातावरण कसं असेल ? हा प्रश्न क्रीडा चाहत्यांना भेडसावत आहे. मात्र, साउदम्टनमधून आनंदाची बातमी आली आहे. मंगळवारी साउदम्टनमध्ये पावसाचा अंदाज नाही. दिवसभर सुर्यप्रकाश असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

उर्वरित दोन दिवसांत प्रत्येकी 98 षटकांप्रमाणे जास्तित जास्त 196 षटकांचा खेळ बाकी आहे. या षटकांत कसोटी निकाली न ठरल्यास भारत आणि न्यूझीलंड यांना संयुक्त विजेतेपद देण्यात येणार आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आयसीसी आणखी एका राखीव दिवसाचा विचार करत आहे. याबाबत आयसीसीकडून कोणतेही आधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *